TRENDING:

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार! 'मुलीशी का बोलतो' विचारत तरुणाची हत्या; कोथरुड हादरलं!

Last Updated:

Pune Crime Nagesh jadhav Murder Case : नागेश जाधव असं हत्या झालेल्या दुर्दैवी 23 वर्षाच्या तरुणाचं नाव असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Crime News : पुण्यातील गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. लहान लहान पोरांना गुन्हेगारीचं आक्रषण वाढत चाललंय. अशातच कोथरूड परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून 10 जणांच्या टोळीने मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली. नागेश जाधव असं हत्या झालेल्या दुर्दैवी 23 वर्षाच्या तरुणाचं नाव असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. याप्रकरणी मयत नागेशच्या आईने खळबळजनक आरोप केला आहे.
Pune Crime Nagesh jadhav Murder Case
Pune Crime Nagesh jadhav Murder Case
advertisement

मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येतीये. नागेश जाधव आणि संबंधित अल्पवयीन मुलगी हे एकमेकांचे जुने मित्र होते. मात्र, त्यांच्या या ओळखीला आणि त्यांच्यात होणाऱ्या संवादाला मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. नागेश हा पुण्यातील शिवाजीनगर येथे ऑफिस बॉय म्हणून काम करतो. नागेशची आई घरकाम करते. मृत नागेशच्या आईने केलेल्या खळबळजनक आरोपानुसार, त्या मुलीनेच नागेशला मोबाईलवरून मेसेज करून भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं. नागेश तिला भेटण्यासाठी गेला असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या मुलीच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला अन् त्याचा जीव घेतला.

advertisement

Pune Crime : चुकीला माफी नाही! हडपसरमधील गँगस्टर टिपू पठाण टोळीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

"मुलीशी का बोलतो?" नागेशला बेदम मारहाण 

या हल्ल्यात नागेशचा जागीच मृत्यू झाला. आपली मैत्री इतक्या टोकाच्या थराला जाईल आणि आपला जीव घेईल, याची कल्पनाही नागेशला नव्हती. मुलीच्या घरच्यांनी अत्यंत क्रूरपणे त्याचा जीव घेतल्याचा आरोप फिर्यादीमध्ये नागेशच्या आईने केला आहे. "मुलीशी का बोलतो?" हा प्रश्न विचारत आरोपींनी नागेशला बेदम मारहाण करत संपवून टाकल्याने आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलाय. या घटनेनंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला.

advertisement

आईला फोन करून शिवीगाळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

दरम्यान, हत्येच्या दिवशी म्हणजेच 14 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास नागेशला एक फोन आला. त्यानंतर तो तातडीने घरातून गाडी घेऊन निघाला. त्यानंतर रात्री 8 च्या सुमारास नागेशच्या फोनवरून एका व्यक्तीने त्याच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. तसेच आम्ही नागेशला मारलं असून त्याला घेऊन जा नाहीतर फेकून देऊ अशी धमकी दिली. त्यानंतर आईने जेव्हा घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नागेशला खूप मारण्यात आलं होतं. नागेशने आईला झालेली घटना सांगितली. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार! 'मुलीशी का बोलतो' विचारत तरुणाची हत्या; कोथरुड हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल