नेमके घडले काय?
हल्ला झालेले पोलिस हे गुन्हे शाखा युनीट-3 मधे कार्यरत असून त्यांचे नाव अमोल काटकर असे आहे. दरम्यान ड्युटी संपवून घरी जात असताना रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
पहिल्यांदा तर दुचाकीवरुन आरोपी आले आणि थेट त्यांनी काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. रस्त्यावर अशा प्रकारे सशस्त्र हल्ला होणे हे पुणे शहरातील गुंडांची वाढलेली हिंमत आणि पोलिसांना नसलेला धाक स्पष्टपणे दर्शवते.
advertisement
क्षुल्लक वादातून पोलिसावर कोयता हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच जेव्हा रस्त्यावर असुरक्षित होतात तेव्हा संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि गृह विभागावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. कोयता गँगच्या दहशतीने पुणेकर त्रस्त असताना आता थेट गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणे हा पुणे पोलिसांना दिलेला थेट इशारा मानला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात तीव्र संताप असून, हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे.