चुलतीला म्हणाला 'आय लव्ह यू'
साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) हा आंबेडकर वसाहतीत राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. एका रात्री त्याने आपल्या चुलतीकडे जाऊन 'आय लव्ह यू' असं म्हटला. हा प्रकार चुलतीचा मुलगा, सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21) याला समजला. आपल्या आईसोबत असे वर्तन केल्याने सोन्याला प्रचंड राग आला. त्याने त्याचा मित्र समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) याला सोबत घेतले आणि साईनाथला अमानुष मारहाण केली.
advertisement
लाथा-बुक्क्यांनी बेदम मारलं
या दोघांनी साईनाथला हॉकी स्टिक आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारलं. मारहाण करताना साईनाथ गंभीर जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत सोडून दोघेही तिथून निघून गेले. वर्मी घाव लागल्याने साईनाथचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर, आरोपी सोन्यानेच पोलिसांना फोन करून एक व्यक्ती रस्त्यावर पडला असल्याची माहिती दिली.
पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता साईनाथचा मृतदेह त्यांना आढळला. सुरुवातीला पोलिसांना हा एक बेवारस मृतदेह वाटला. पण, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मारहाणीचे कारण समोर आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास करत असताना पोलिसांना सोन्या आणि त्याच्या मित्रावर संशय आला. चौकशी केल्यावर सोन्याने आणि त्याच्या मित्रानेच साईनाथचा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. त्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १०३ (१)३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.