घायवळला 90 दिवसांचा व्हिसा
पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्यांचे लोकेशन लंडन आहे अशी माहिती मिळाली होती. मात्र, तो लंडनमधून नसून दुसऱ्याच देखील असल्याचं समजतंय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश घायवळ सध्या स्विर्त्झंलंडमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला 90 दिवसांचा व्हिसा देखील मिळाला आहे. त्यामुळे आता निलेश घायवळला 90 दिवसानंतर अटक करणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
अहिल्यानगरच्या आयुक्तालयातून पासपोर्ट
निलेश घायवळ याला अहिल्यानगरच्या आयुक्तालयातून पासपोर्ट देण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हीसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला? यावर पुणे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. पासपोर्ट कधी, केव्हा, कसा मिळवला? यावर देखील चौकशी आणि कारवाई सुरू असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
"Not Available" रिमार्क
सराईत गुन्हेगार निलेश घायवळ याच्या पासपोर्टबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. नमूद केलेल्या पत्त्यावर कोतवाली पोलीसांनी पडताळणी केली असता संपर्क होऊ शकला नाही आणि सदर पत्त्यावर मिळून आला नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदरचे पासपोर्ट प्रकरण 16 तारखेला प्रतिकूल म्हणजेच "Not Available" रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवले होते, अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली होती.