ही कारवाई १३ जानेवारी रोजी सायंकाळी दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. चाकण परिसरातील एका बसशेडच्या जवळ असलेल्या बंद शेडमध्ये काही लोक बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तिथे अचानक छापा टाकला. या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे समजते.
advertisement
गुन्हा दाखल झालेले आरोपी: या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र पंढरीनाथ भालेराव (वय ६९), अवधूत भीमराव रायबोले (वय ४२), केशव सुखदेव घोडके (वय २६), त्र्यंबक गंगाधर मांडेकर (वय ३०), अशोक निवृत्ती सूर्यवंशी (वय ५९), अविनाश सुरेश जाधव (वय ३४) आणि दिनेश परसराम जाधव (वय ४८) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून, या कारवाईमुळे चाकणमधील जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.
