अशी झाली फसवणूक: फिर्यादी गुंजन गौरव अट्रावलकर (वय ३१) यांना २८ जुलै ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सायबर चोरट्यांनी एका ऑनलाइन ग्रुपमध्ये सामील केले. तिथे शेअर मार्केट आणि नवीन आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर एका अज्ञात लिंकद्वारे त्यांना एक ॲप डाऊनलोड करायला लावले.
advertisement
सुरुवातीला ॲपमध्ये नफा दिसत असल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर 'कॅपिटल व्हेरिफिकेशन' आणि अधिक गुंतवणुकीच्या बहाण्याने आरोपींनी गुंजन यांना विविध बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले. अशा प्रकारे त्यांनी एकूण ५५ लाख २२ हजार ५०० रुपये गुंतवले. मात्र, जेव्हा त्यांनी स्वतःचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी मंगळवारी (१३ जानेवारी) रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी ज्या बँक खात्यांवर पैसे वळवण्यात आले, त्यांचा तपास सुरू केला आहे. "मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी पडून कोणत्याही अज्ञात लिंकवर पैसे भरू नका," असे आवाहन रावेत पोलिसांनी केले आहे.
