TRENDING:

पुण्याच्या सायकल टूरमध्ये भीषण अपघात, 50 सायकलस्वार एकमेकांवर आदळले; मोठी खळबळ

Last Updated:

पुण्यातील तिकोना किल्ल्याजवळ अरूंद रस्त्यावर अपघात झाल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  जागतिक स्तरावर पुण्याचे नाव उज्वल करणाऱ्या भव्य सायकलिंग स्पर्धेला अपघाताचे गालबोट लागले आहे. 'बजाज पुणे ग्रँड सायकल टूर' मध्ये मंगळवारी अपघात झाला आहे. स्पर्धेदरम्या एका खेळाडूचा सायकलवरील ताबा सुटल्याने मागून येणारे जवळपास 50 हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर जोरात आदळले. या विचित्र अपघातात अनेक सायकलस्वार जखमी झाले असून मोठी खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. स्पर्धेदरम्यान सायकलचा वेग प्रचंड असल्याने मागून येणाऱ्या खेळाडूंना ब्रेक लावणे अशक्य झाले. त्यामुळे काही क्षणातच एकावर एक सायकलींचा खच पडला. यामध्ये अनेक खेळाडूंना गंभीर दुखापत झाली असून सायकलींचे अक्षरश: तुकडे झाले होते.

advertisement

नेमका कसा झाला अपघात? 

अपघात झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी तैनात असलेल्या रुग्णवाहिका आणि डॉक्टरांच्या पथकाने तातडीने धाव घेतली. जखमी खेळाडूंना प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने, डोक्याला हेल्मेट असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी अनेक खेळाडूंना या अपघातामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

आयोजकांच्या चुकांमुळे घडला अपघात?

advertisement

तिकोना किल्ल्याजवळ अरूंद रस्त्यावर अपघात झाल्याचे समोर आले आहे. नियोजनाबाबत खेळाडूंमध्ये नाराजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत सुरक्षेचे सर्व नियम पाळले जात असल्याचा दावा आयोजकांनी केला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू एकमेकांवर आदळल्याने मार्गावरील नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांमध्ये आवश्यक बदल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा खास रेसिपी, सगळे विचारतील बनवली कशी? Video
सर्व पहा

437 किलोमीटर इतकं या शर्यतीचं अंतर आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 असं या स्पर्धेचं औपचारिक नाव आहे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलतर्फे आयोजित होणारी 2.2 मल्टी स्टेज शर्यत भारतात पहिल्यांदाज आयोजित होत आहे. या शर्यतीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या सायकल टूरमध्ये भीषण अपघात, 50 सायकलस्वार एकमेकांवर आदळले; मोठी खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल