गेल्या दहा वर्षात यवत परिसरात राज्यातून परराज्यातून स्थलांतरित मुस्लिमांची संख्या मोठी आहे. स्थानिक मुस्लीम आणि स्थानिक हिंदू यांच्यात कुठलाच संघर्ष नव्हता. मात्र वाढत्या शहरीकरण्याच्या पार्श्वभूमीवर गुंठेवारीच्या जमिनी विकत घेऊन बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या मुस्लीम तरूणाने मध्यप्रदेशच्या छत्रपूर मध्ये पुजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह मजकूर स्टेटसला ठेवल्याने वाद चिघळलाय.
advertisement
वाद कसा चिघळला?
अशाच आणखी बाहेरून आलेल्या मौलवीने या परिसरात जागा घेऊन मशिदीसदृश्य इमारत उभारली होती.तिथे स्वतःचा दरबार लावून त्याचं कामकाज सुरू होतं. येथे येणाऱ्या तरुणांना या मौलवीकडून कट्टरतेचे अनुकरण करायच्या सूचना दिल्या जात होत्या. त्यात हा संबंधित तरूण ही येत जात असल्याचं समोर आलंय. त्या तरूणाने ठेवलेल्या स्टेटसन् हा वाद चिघळलाय आणि दंगल पेटल्याच उघड झालंय.
नेमकं काय घडलं?
रविवारी 27 जुलै रोजी यवत रेल्वे स्टेशनलगत असलेल्या एका धार्मिक स्थळात पुतळ्याच्या विटंबनेची संतापजनक घटना उघडकीस आला. त्यानंतर दौंड तालुक्यात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी यवतमध्ये हिंदुत्ववादी संघटांचा मोर्चा काढला. दरम्यान एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनचं यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला यवत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. खरं तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून यवतमध्ये वातावरण खदखदत असताना पोलिसांनी त्याची वेळीच दखल का घेतली नाही? दोन गटातील तणाव दूर करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न का केले नाहीत ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.