पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक पदासाठी 434 जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. अद्याप नोकरभरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. 434 पदांसाठी 1 डिसेंबर 2025 पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्यासाठी बराच काळ अवधी शिल्लक आहे. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून 20 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://www.pdcc.bank.in/ येथे भेट द्यावी. दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
advertisement
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे, शिवाय अर्ज शुल्काची प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज शुल्काची आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख एक सारखीच असणार आहे. दरम्यान, ऑनलाइन परीक्षेची तारीख बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, ऑनलाइन परीक्षेचे हॉलतिकिट डाउनलोड करण्याची तारीख, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठीच्या तारखा देखील बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील. अर्जदारांसाठीही एक महत्त्वाची माहिती आहे, एकूण रिक्त जागांपैकी 70% जागा पुणे जिल्ह्यात रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असणार आहे. तर, उर्वरित 30% पदं पुणे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी असणार आहेत. जर पुणे जिल्ह्याबाहेरील पुरेसे पात्र उमेदवार मिळाले नाहीत, तर उर्वरित पदे पुणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून भरली जातील.
