भाजपला धूळ चारत विजय खेचला
विशेष म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत हा विजय मिळवला. ही निवडणूक कौटुंबिक आणि राजकीय संघर्षासाठी अधिक चर्चेत राहिली होती, कारण माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित शिवरकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपाने त्यांनाच मैदानात उतरवले होते, मात्र प्रशांत जगताप यांनी त्यांना धूळ चारत विजय खेचून आणला.
advertisement
नाकावर टिच्चून विजय मिळवला
प्रशांत जगताप यांच्या या विजयामुळे पुणे महानगरपालिकेत काँग्रेसने आपले विजयाचे खाते उघडले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. अभिजित शिवरकर यांच्या रूपाने भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मतदारांनी शेवटी काँग्रेसच्या बाजूने आपला कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला आहे.
