मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. टोनी धाब्याजवळ हा अपघात झाला आहे. पेट्रोलचा टँकर आणि एका भरधाव कंटेनर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, पेट्रोलचा टँकर हा महामार्गावरून खाली उतरला. या अपघातात दोन्ही पेट्रोलच्या टँकरचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर कंटेनरच्या केबिनचंही मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र, पेट्रोलने भरलेला टँकर असल्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे.
advertisement
मात्र, या अपघातामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाणाऱ्याा वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त पेट्रोलचा टँकर आणि कंटेनर हटवण्याचं काम सुरू आहे.
१२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होणार
दरम्यान, आडोशी बोगद्याजवळ अजूनही गॅस गळती टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या कंटेनरमध्ये १२ टन गॅस असल्याची माहिती समोर आला आहे. एकूण ४ टँकरमध्ये हा गॅस भरला जाणार आहे. रात्री ८ वाजपर्यंत २ टँकरमध्ये गॅस भरलाा आहे. आणखी २ टँकरमध्ये गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याठिकाणी मदतकार्य करणाऱ्यांना लोणावळा मुस्लिम समाजाच्या तरूणांनी बिस्किट,पाणी आणि नाष्टा वाटप करण्यात आले आहे.
