आरोग्य विभाग सतर्क, घाबरण्याचं कारण नाही
पुण्यात पहिला रुग्ण आढल्यानंतर आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही, असं स्पष्ट करत आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
नवा स्ट्रेन गंभीर नाही
advertisement
गेल्या काही दिवसांत दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, सध्या आढळणारा व्हायरस तुलनेने सौम्य असून तो फारसा घातक नाही. तरीही जेष्ठ नागरिक, अस्थमा, मधुमेह किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जातोय.
कोणती खबरदारी घ्यावी?
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे.
वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं.
सर्दी, खोकला, ताप यांसारखे लक्षणे असल्यास तात्काळ चाचणी करणे.
जेष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी नियमित करावी.
दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा कोरोना आढळल्याने काही नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असलं, तरी आरोग्य विभागाकडून वेळेवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, खबरदारी घेण्यावर भर द्यावा, असा सल्ला देण्यात येत आहे.