TRENDING:

Pune Crime: आधी वाटलं 'ती पाय घसरून पडली', पण शेवटी निघालं 'कांड'! पुण्यातील वैष्णवीच्या मृत्यूमागे पतीचाच भयंकर कट

Last Updated:

"पत्नी घरात पाय घसरून पडली आणि त्यातच तिचा जीव गेला," असा बनाव रचून गुन्ह्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीसह तिघांच्या मुसक्या खडक पोलिसांनी आवळल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुण्यातील गंजपेठ परिसरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू हा अपघात नसून तिचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. "पत्नी घरात पाय घसरून पडली आणि त्यातच तिचा जीव गेला," असा बनाव रचून गुन्ह्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीसह तिघांच्या मुसक्या खडक पोलिसांनी आवळल्या आहेत.
पतीनेच केली हत्या (AI Image)
पतीनेच केली हत्या (AI Image)
advertisement

नेमका प्रकार काय?

वैष्णवी ऊर्फ वर्षा तुषार तुपसौदर्य (वय २३) असे खून झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. सुरुवातीला तिचा मृत्यू हा नैसर्गिक किंवा अपघाती असल्याचा दावा सासरच्या मंडळींकडून करण्यात आला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला 'अकस्मात मृत्यू' अशी नोंद केली होती. मात्र, वैष्णवीच्या शरीरावरील खुणा आणि घटनास्थळावरील संशयास्पद बाबींमुळे खडक पोलिसांना संशय आला.

advertisement

तपासात उघड झाला बनाव

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता लतोंडे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, वैष्णवीचा मृत्यू पडल्यामुळे झाला नसून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पती तुषारने आपल्या साथीदारांच्या मदतीने पुरावे नष्ट करत वैष्णवी पडल्याचा बनाव रचला होता, जेणेकरून तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकेल.

advertisement

तिघांना बेड्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AC चं बिल येईल शुन्य रुपये! 3-4 अंशावर रूम होईल गार, किंमत ऐकून बसेल शॉक!
सर्व पहा

याप्रकरणी खडक पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुपसौदर्य (२८), मनोज रोहिदास कांबळे (३९) आणि वनिता मनोज कांबळे (३२) यांना अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: आधी वाटलं 'ती पाय घसरून पडली', पण शेवटी निघालं 'कांड'! पुण्यातील वैष्णवीच्या मृत्यूमागे पतीचाच भयंकर कट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल