मानाच्या गणपती आधीच विसर्जन मिरवणूक
विसर्जन मिरवणुकीवरून पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मतभेद पहायला मिळत आहे. अनेक मंडळानी एकत्रित येत अनेक वेगळे निर्णय घेतले असल्याने हा वाद झाल्याचं पहायला मिळत आहे. आम्ही आधी विसर्जन मिरवणुक काढू, असं काही मंडळ म्हणत आहेत. तर तब्बल 100 मंडळानी मानाच्या गणपती मंडळाच्या आधीच विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
मंडळांमध्ये मानपान आणि मतभेद
विर्सजनामुळे सुरू असेल्या वादावरून पुण्यात पुन्हा बाप्पाच्या मंडळांमध्ये मानपान आणि मतभेद पहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाची पुण्यातील विसर्जन मिरवणूक कशी पार पडणार? असा सवाल विचारला जात आहे. दरवर्षी प्रमाणे पुण्यातील मिरवणूक शांततेत पार पडावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.
मिरवणुकीला सर्वात जास्त डीजेचा वापर
दरम्यान, ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी गणेशोत्सवानिमित्त मोठा निर्णय घेतला होता. जे गणपती मंडळ डीजे लावतील त्यांना देणगी न देण्याचा निर्णय पुण्यातील उद्योजक सुनीत बालन यांनी घेतला आहे. शेवटच्या दिवशी म्हणजेच मिरवणुकीला सर्वात जास्त डीजेचा वापर केला जातो. अशातच मिरवणुकीत ढोल ताशांचा वापर केला जावा यासाठी पुनीत बालन यांना हा निर्णय घेतलाय.