मुरलीधर मोहोळ बैठक घेणार
मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता केळकर रस्ता, टिळक रस्तावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत. मानाच्या पाच आणि तीन गणेश मंडळ विरुद्ध इतर गणेश मंडळ असा एक वेगळा वाद सध्या सुरू आहे. विसर्जन मिरवणूक लवकर निघावी ही मागणी गणेश मंडळाची आहे.
advertisement
मंडई अन् भाऊसाहेब रंगारी मंडळांचा निर्णय मागे
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांनंतर लगेच सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने मागे घेतला आहे, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. दोन्ही मंडळांच्या मिरवणुका दरवर्षीप्रमाणे संध्याकाळच्या वेळेत निघेल, असं देखील त्यांनी जाहीर केलं आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळ ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आपला निर्णय मागे घेतला आहे.
नेमका वाद का?
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांनंतर लगेच सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने पत्रकार परिषद घेऊन घेतला होता. त्यानंतर इतर मंडळांनी आक्रमक भूमिका घेत आम्ही देखील सकाळी 7 ते 11 च्या वेळात म्हणजेच मानाच्या पाच गणपतींच्या आधी मिरवणूक सुरू करण्याची आक्रमक भूमिका मांडली. त्यामुळे पुण्यातील मिरवणुकीचा वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर आता मानाच्या गणपतींना पहिलं विसर्जन करण्याचा मान मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी अनेक बैठक घेतला मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज मोहोळ हे घेतलेल्या बैठकीत तरी तोडगा निघणार का? याकडे लक्ष आहे.