समोर आलेल्या माहितीनुसार, प्रत्युषा आपल्या आईसोबत गणपती खरेदीसाठी निघाली होती. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक मिक्सरने त्यांना जोरदार धडक दिली. भीषण अपघातात ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने चिमुकली प्रत्युषाचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून ते पाहून अंगावर शहारे येतात.
मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकासह त्याच्या मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, केवळ चालकावर कारवाई करून मूळ मालक मात्र वाचवले जात असल्याचा संतप्त आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. बांधकाम प्रकल्पांसाठी अशा अवजड वाहनांचा वाहतूक मार्गांवर उच्छाद सुरू असून त्यामागे संबंधित बांधकाम व्यावसायिकांना पोलिस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही प्रत्युषाच्या पालकांनी केला आहे.
advertisement
"अन्यथाआम्ही रस्त्यावर उतरू", प्रत्युषाच्या वडिलांचा प्रशासनाला इशारा
“आमच्या मुलीचा बळी गेला, पण अजूनही रस्त्यांवर अवजड वाहनांची दहशत कायम आहे. यामागील खरे गुन्हेगार म्हणजे बांधकाम व्यावसायिकच आहेत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा प्रत्युषाच्या वडिलांनी दिला.
अपघाताचा CCTV Video समोर
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
हिंजवडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे दिवस-रात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. प्रशासनाकडून कोणताही ठोस बंदोबस्त नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेवर गदा येत असून, या अपघाताने पुन्हा एकदा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.