गेल्या सात वर्षांपासून ही योजना अंमलबजावणीत यावी यासाठी अनेकदा प्रस्ताव ठेवण्यात आले. मात्र, प्रशासकीय विलंब, निविदा प्रक्रियेतल्या अडचणी आणि स्थानिक राजकीय दबावामुळे ही योजना पुढे सरकू शकली नव्हती. अखेर वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीनंतर शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर पे अँड पार्कची सुरुवात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. सहा रस्त्यांवर प्रायोगिक पार्किंग मध्ये समावेश करणार आला आहे.शहरातील लक्ष्मी रस्ता,शुक्रवारपेठ परिसर,शनिवार पेठ परिसर,येरवडापरीसरातील ठाकरे चौक ह्या रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे.या रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक आणि अवैध पार्किंगची समस्या असल्याने प्रायोगिक टप्प्यात या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.
advertisement
शहरातील प्रमुख 300 चौकांतून वाहतूक कोंडी कमी होणार?
शहरातील मुख्य 45 रस्ते नो हॉकर्स झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या रस्त्यांसह,शहरातील इतर 300 अधिक चौकांमध्ये 50 मीटर पर्यंत नो पार्किंग झोन तयार करण्यात आले. पुणे वाहतूक पोलिसांनी पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील 14 चौकांमध्ये नो पार्किंगची अंमलबजावणी केल आहे. परिणामी वाहतूक सुरळीत आणि गतिमान होणार आहे.
नागरिकांना किती पैसे मोजावे लागणार?
पे अँड पार्क योजनेअंतर्गत चारचाकी वाहनधारकांना प्रतितास 30ते 50 रुपये आणि दुचाकी चालकांना 10 ते 20 रुपये शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. महापालिका यामधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवू शकेल