डॉक्टर शिरीष खेडगीकर म्हणाले, "व्यंकटेश भगवान खेडगीकर, असं स्वामीजींचं पूर्ण नाव होतं. कर्नाटकातील सिंदगीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. बेथूजी गुरुजी हे स्वामीजींचे ज्येष्ठ बंधू होते. 1997 मध्ये मी स्वामीजींना भेटण्यासाठी हैदराबाद येथे गेलो होतो. त्यांचा स्वभाव एकदम शांत होता. ओळखीच्या लोकांशी ते चांगल्या गप्पा मारत. त्यावेळी स्वामीजींनी माझ्यासोबत छान गप्पा मारल्या होत्या. त्यांनी माझ्या आवडीनिवडी विचारून घेतल्या होत्या."
advertisement
Rain Update: छ. संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड अन् पैठणला अतिवृष्टीचा तडाखा; शेतकरी हवालदिल, Photo
स्वामीजींची अजून एक आठवण सांगताना डॉक्टर शिरिष म्हणाले, "स्वामीजी अंबेजोगाईध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये यायचे. त्यावेळी सकाळी त्यांना एका ठिकाणाहून दररोज जेवणाचा डबा येत असे. संध्याकाळचं जेवण मात्र, आमच्या घरून जात असे. नाचणीची भाकरी आणि एखादी भाजी असलेला डबा घेऊन मी त्यांच्याकडे जात होतो. त्यावेळी ते माझ्या अभ्यासाची आणि प्रगतीची चौकशी करत."
हैदराबाद येथील निजामाच्या सेनापतीने मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार सुरू केले होते. त्यावेळी स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून काम पाहत होते. त्यांनी जनतेला सोबत घेऊन निजामाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भूमिगत राहून त्यांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले होते.