Marathwada Mukti Sangram: निजामशाही विरुद्ध लढले, कसा होता स्वामी रामानंद तीर्थ यांचा स्वभाव? पुतण्याने दिला आठवणींना उजाळा
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Marathwada Mukti Sangram: निजाम मराठवाड्यातील जनतेला प्रचंड त्रास देत होता. स्वामी रामानंद तीर्थ जनतेला सोबत घेऊन निजामाला विरोध केला होता.
छत्रपती संभाजीनगर : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या ताब्यातून स्वातंत्र्य मिळालं. मात्र, काही भाग असूनही स्थानिक शासकांच्या अधिपत्याखाली होता. तत्कालीन हैदराबाद संस्थानाचा (मराठवाड्याचा काही भाग) देखील यात समावेश होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा प्रदेश निजामांच्या तावडीतून मुक्त झाला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती संग्राम' दिन म्हणून साजरा केला जातो. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक स्वातंत्र्यविरांनी प्रयत्न केले. स्वामी रामानंद तीर्थ हे या लढ्यातील मोठं नावं होतं. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे डॉक्टर शिरीष खेडगीकर यांनी आठवणींना उजाळा दिला आहे..
डॉक्टर शिरीष खेडगीकर म्हणाले, "व्यंकटेश भगवान खेडगीकर, असं स्वामीजींचं पूर्ण नाव होतं. कर्नाटकातील सिंदगीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. बेथूजी गुरुजी हे स्वामीजींचे ज्येष्ठ बंधू होते. 1997 मध्ये मी स्वामीजींना भेटण्यासाठी हैदराबाद येथे गेलो होतो. त्यांचा स्वभाव एकदम शांत होता. ओळखीच्या लोकांशी ते चांगल्या गप्पा मारत. त्यावेळी स्वामीजींनी माझ्यासोबत छान गप्पा मारल्या होत्या. त्यांनी माझ्या आवडीनिवडी विचारून घेतल्या होत्या."
advertisement
स्वामीजींची अजून एक आठवण सांगताना डॉक्टर शिरिष म्हणाले, "स्वामीजी अंबेजोगाईध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये यायचे. त्यावेळी सकाळी त्यांना एका ठिकाणाहून दररोज जेवणाचा डबा येत असे. संध्याकाळचं जेवण मात्र, आमच्या घरून जात असे. नाचणीची भाकरी आणि एखादी भाजी असलेला डबा घेऊन मी त्यांच्याकडे जात होतो. त्यावेळी ते माझ्या अभ्यासाची आणि प्रगतीची चौकशी करत."
advertisement
हैदराबाद येथील निजामाच्या सेनापतीने मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार सुरू केले होते. त्यावेळी स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून काम पाहत होते. त्यांनी जनतेला सोबत घेऊन निजामाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भूमिगत राहून त्यांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले होते.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 16, 2025 1:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathwada Mukti Sangram: निजामशाही विरुद्ध लढले, कसा होता स्वामी रामानंद तीर्थ यांचा स्वभाव? पुतण्याने दिला आठवणींना उजाळा






