पुण्यात वाहतुकीसाठी 66 मार्गांवर मोठा फेरबदल; जाणून घ्या नवीन मार्गसूची
त्याचबरोबर पुणे मेट्रोनेही वाहतूक व्यवस्थेत होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल केले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रोमध्ये अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत, ज्यामुळे गर्दीतून प्रवास अधिक सोपा होईल. 'पीएमपी'च्या बसमार्गांमध्येही बदल करण्यात आले असून, तब्बल 66 मार्गांवर फेरबदल करण्यात आले आहेत. या बदलांचा उद्देश गर्दीच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थित ठेवणे आणि भाविकांना अडथळा न येता सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे आहे.
advertisement
वाहतुकीवर बंदी असलेल्या रस्त्यांमध्ये शास्त्री रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, कर्वे रोड, एफसी कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, सिंहगड रोड आणि गणेश रोड यांचा समावेश आहे. तसेच लक्ष्मी रोडवर हमजेखान चौक ते टिळक चौक, शिवाजी रोडवर गाडगीळ पुतळा चौक ते मंडई परिसर, बाजीराव रोडवर पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक, टिळक रोडवर हिराबाग चौक ते नेहरू स्टेडियम परिसर तसेच सुभेदार तालीम, पानघंटी चौक, गंज पेठ चौक, सेंट्रल स्ट्रीट आणि जेधे प्रसाद रस्ता यावर सायंकाळी 5 नंतर वाहतुकीवर बंदी राहणार आहे.
या रस्त्यांवर पार्किंग करण्यास आता बंदी
गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने नो-पार्किंग झोनसुद्धा जाहीर केले आहेत. शिवाजी रोडवर जिजामाता चौक ते मंडई चौक, लक्ष्मी रोडवर मुंबई चौक ते शनिपार चौक, बाजीराव रोडवर शनिपार चौक ते फुलकाबुरुज आणि आप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठ या मार्गांवर संपूर्ण नो-पार्किंग लागू केले आहे. या मार्गांवर वाहनं थांबवण्यास बंदी असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असा प्रशासनाचा सल्ला आहे.
एकूणच, शहरातील वाहतुकीच्या व्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा उद्देश गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची सुरक्षाही सुनिश्चित करणे आणि शहरातील वाहतूक गतीमय ठेवणे आहे. नागरिकांनी या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, या बदलांमुळे शहरातील गर्दी नियंत्रित राहण्यास मदत होईल. प्रशासनाने प्रवाशांसाठी आणि वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामुळे गर्दीतून सुटका मिळण्यास मदत होईल. या उपाययोजनांमुळे पुणेतील गणेशोत्सव सुरक्षित, आनंददायी आणि सुव्यवस्थित पार पडेल, असे प्रशासनाचे मान्य आहे.