एकेकाळी पुण्यातली महात्मा फुले मंडई ही गुन्हेगारीचे विद्यापीठ म्हणून नावाजलेली होती या विद्यापीठात माळवतकर, बोडके, मिसाळ यासारख्या टोळ्यांची पाळमुळं रुजलेली होती. हळूहळू शहरांच्या उपनगरांमध्ये अनेक टोळ्या उदयाला आल्या. यामध्ये प्रामुख्याने येरवडा, कोंढवा, महंमदवाडी, हडपसर या भागांचा समावेश होता. मात्र या टोळ्यांच्या कारवाया स्थानिक आणि किरकोळ स्वरूपाच्या होत्या.
कोथरूड आणि आसपासच्या परिसरामध्ये फोफावल्या
advertisement
दरम्यानच्या काळात पुण्याच्या अवतीभवती असलेल्या गावांमधल्या जमिनींना सोन्याचा भाव आला आणि खास करून मुळशी पट्ट्यातली अनेक मुलं ही पहिलवान की करता करता गुन्हेगारीकडे वळाली.त्यातली महत्त्वाची नावे म्हणजे गजा मारणे टोळी,बाबासाहेब बोडके टोळी,संदीप मोहोळ टोळी पुढे शरद मोहोळ टोळी,गणेश मारणे टोळी अशा टोळ्या कोथरूड आणि आसपासच्या परिसरामध्ये फोफावल्या. गजा मारणेचा कधीकाळी सहकारी असलेल्या निलेश घायवळ याने पुढे फुटून गेल्यानंतर स्वतःची टोळी सुरू केली. मात्र एवढं सगळं झालं तरी गेल्या चार-पाच वर्षापर्यंत पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांची संख्या ही स्थानिक आणि मर्यादित स्वरूपाची होती .
टोळ्यांचा उदय कसा झाला?
गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या आकर्षणाने गुन्हे करणाऱ्या अनेक तरुणांवर पोलिसांनी मकोकासारख्या कठोर कायद्याचा अवलंब केला. शेकडो तरुण गुन्हेगार येरवडा नावाच्या गुन्हेगारीच्या विद्यापीठात गेले आणि बाहेर आले ते थेट गुन्हेगारी टोळ्या चालवायचं तयार करायचं प्रशिक्षण घेऊन… त्याचा परिणाम असा झाला आहे की शहराच्या उपनगरांमध्ये नव्याने जवळपास 80 टोळ्यांचा उदय झालाय आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या टोळ्यांचा आगार ठरलंय ते म्हणजे कोथरूड …आणि त्याच्या आसपासचा परिसर.
80 टोळ्यांपैकी सुमारे 40 टोळ्या या कोथरूडमधल्या
पुण्यातील 80 टोळ्यांपैकी सुमारे 40 टोळ्या या कोथरूड आणि परिसरातल्या आहेत. त्यामुळे महात्मा फुले मंडई नंतर आता कोथरूड हे पुण्याच्या गुन्हेगारीच नवं आगार ठरतंय . ज्या कोथरूडमध्ये एक केंद्रीय राज्यमंत्री, राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री,एक खासदार नेतृत्व करतात त्याच कोथरूडमध्ये राज्याला हादरवून टाकणारे गुन्हेगारी टोळ्यांचे आकडे समोर आलेत.
पोलिसांनी अलीकडेच झालेल्या टोळी युद्धानंतर शहरात कार्यरत असलेल्या टोळ्यांची यादीच बनवली आहे.
पाच वर्षात 36 नव्या टोळ्या उदयाला
या यादीतून झोन-तीन म्हणजेच पुणे पोलिसांच्या प्रशासकीय हद्दीचा तिसरा प्रभाग ज्यात प्रामुख्याने कोथरूड चा समावेश होतो. तिथेच तब्बल 36 नव्या टोळ्या गेल्या पाच वर्षात उदयाला आल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी धक्कादायक तर आहेच मात्र कोथरूड सारख्या उच्चभ्रू उपनगरात जिथे समाजातले अनेक नावजलेल्या व्यक्ती राहतात तिथे इतक्या मोठ्या संख्येने होणारा गुन्हेगारी टोळ्याचा उदय हा चितेंचा विषय आहे.
हे ही वाचा :