भाजपकडून राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र शिंदे यांचा पराभव करत आपली जागा कायम राखली. घुले यांच्या विजयामुळे प्रभागात राष्ट्रवादीची उपस्थिती टिकून राहिली. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला आहे.
तसेच पुण्यात काँग्रेसने खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक 18 मधून साहिल केदारी यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आता पुण्याची लढत अधिक चुरशीची झाली आहे.
advertisement
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर शहरवासीयांना आपला कौल देण्याची संधी मिळाली आहे. शहरातील ४१ प्रभागांमधून एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. या निवडणुकीत चौरंगी सामना रंगला होता. महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असल्याने स्पर्धा तीव्र झाली होती. अशातच आता कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार? असा सवाल विचारला जात आहे.
