वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. विविध भागांतील बदलांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. हडपसर परिसर
येथे शिवसेना चौक ते साने गुरुजी परिसरापर्यंतचा रस्ता बंद असेल. वाहनचालकांनी हडपसर वेस - अमरधाम स्मशानभूमी - माळवाडी मार्गाचा किंवा हडपसर गाडीतळ - संजीवनी हॉस्पिटल - डीपी रोड या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.
advertisement
२. कोरेगाव पार्क परिसर
नॉर्थ मेन रोड (लेन सी) ते पाणीपुरवठा केंद्र आणि महात्मा गांधी चौक ते आझाद स्मारकाकडे जाणारे मार्ग वाहतुकीस बंद राहतील. याऐवजी कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म या मार्गाचा वापर करता येईल.
३. समर्थ वाहतूक विभाग
पॉवर हाऊस चौक ते बॅनर्जी चौक, संत कबीर चौक ते क्वार्टरगेट आणि रामोशी गेट ते जुना मोटार स्टँड हे मार्ग बंद असतील. प्रवाशांनी शांताई हॉटेल - क्वार्टरगेट - बाहुबली चौक - सेव्हन लव्हज चौक या मार्गे प्रवास करावा.
४. विमानतळ परिसर
फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता आणि निको गार्डन परिसर बंद राहील. वाहतूक विमाननगर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक किंवा दत्त मंदिर चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
५. विश्रामबाग विभाग (मध्यवर्ती पुणे)
पूरम चौक ते टिळक चौक आणि अलका टॉकीज ते पूरम चौक हे मार्ग पूर्णतः बंद राहतील. नागरिकांनी बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता किंवा दांडेकर पुलाचा वापर करून इच्छित स्थळी जावे.
६. दत्तवाडी विभाग
सणस पुतळा ते ना. सी. फडके चौक आणि सारसबाग खाऊ गल्ली परिसर वाहतुकीसाठी बंद असेल. येथील वाहतूक ए.बी.सी. चौक आणि पूरम चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
