पुणे- नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून दमदार प्रतिसाद मिळत असल्यामुळे रेल्वेकडून या एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या सोयींमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 26101 पुणे- अजनी वंदे भारत एक्स्प्रेस वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुसाट आणि कमी वेळात होणार आहे. रेल्वेकडून पुणे- अजनी वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेमध्ये बदल करण्यासाठी मान्यता दिली आहे.
advertisement
पुणे- अजनी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस अजनी आणि पुणे दरम्यान धावते. सुधारित पीपीटीनुसार, ट्रेन क्रमांक 26101 पुणे- अजनी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या प्रमुख स्थानकांवर तिच्या आधीच्या वेळेपेक्षा लवकर पोहोचणार आहे. सुधारित वेळेनुसार, अकोला, बडनेरा आणि वर्धा स्थानकांवर या ट्रेनची येण्याची आणि सुटण्याची वेळ लवकर असणार आहे, ज्यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळेत बचत होईल. सुधारित वेळापत्रक 26 डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ही ट्रेन अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकांवर सुमारे 10 मिनिटे लवकर पोहोचेल आणि निघेल. शिवाय, वर्धा स्थानकावरही वेळेच्या आधी पोहचेल.
प्रवास करण्याच्या आधी प्रवाशांनी एक्सप्रेसच्या नवीन वेळापत्रकात कशा पद्धतीने बदल झाला आहे, याची व्यवस्थित तपासणी करावी. ट्रेनचे वेळापत्रक तपासूनच प्रवाशांनी प्रवास करावा असा सल्ला देण्यात आला आहे.
