नेमकी घटना काय?
तक्रारदार तरुणी इन्स्टाग्रामवर सक्रिय असून तिने आपल्या खात्यावर काही व्हिडिओ पोस्ट केले होते. एका अज्ञात विकृत व्यक्तीने यातील एक व्हिडिओ परवानगीशिवाय डाऊनलोड केला. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये छेडछाड करत एडिटिंग करून त्यावर तरुणीला उद्देशून अत्यंत खालच्या स्तराचे, अश्लील आणि लैंगिक स्वरूपाचे शेर लिहिले. हा 'एडिटेड' व्हिडिओ आरोपीने स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम खात्यावरून प्रसारित केला.
advertisement
आपल्या व्हिडिओचा असा गैरवापर आणि सामाजिक बदनामी झाल्याचे लक्षात येताच तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस सध्या संबंधित इन्स्टाग्राम खाते आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
सोशल मीडियावर कोणाच्याही फोटो किंवा व्हिडिओचा वापर करून त्यांची बदनामी करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा कतृव्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
