कडाक्याच्या उन्हात बर्फ टाकून बनवलेले शितपेय पिणार असाल तर सावधान राहण्याची गरज आहे. कारण जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे विक्री करण्यात येणाऱ्या एका बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे. हाच बर्फ टाकून अनेक ठिकाणी ग्राहकांना सरबत,गोळा, ऊसाचा रस अशी पेय देण्यात आली आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
कडाक्याच्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना नागरिक थंड शितपेय पिण्याला पसंती देतात खरं. मात्र या शितपेयात वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा दर्जा काय आहे? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होते.
advertisement
ताटात सापडला कंडोमवाला समोसा-
दरम्यान याआधी समोर आलेल्या एका घटनेत पिंपरी चिंचवडमध्ये किळसवाणा प्रकार घडला. औंधमधील एका नामांकित कंपनीतल्या कॅन्टीनमधील समोशात चक्क कंडोम आढळल्याने खळबळ उडाली. रोजच्या प्रमाणे कॅन्टीमध्ये काही जण समोसा खात होते, यावेळी समोशात कंडोम आढळलं. याप्रकरणी चौकशी केलनंतर इतर समोशांचीही तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात किळसवाण्या वस्तू आढळल्या. काही समोश्यात तंबाखूजन्य पदार्थ तर काही समोश्यांमध्ये खडी आढळली. पूर्वीच्या कंत्राटदाराने ठेका रद्द केल्याच्या रागातून एका कर्मचाऱ्याच्या मदतीने समोशात या वस्तू मिसळल्याचं तपासात समोर आलं. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.