नेमकी घटना काय?
तळेगाव दाभाडे येथील रहिवासी दत्तात्रय मारुती कलावडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कलावडे यांनी त्यांचा ३५ लाख रुपये किमतीचा जेसीबी नेहमीप्रमाणे भांबोली येथील प्लांटच्या पार्किंगमध्ये उभा केला होता. मात्र, रात्रीच्या सुमारास चोरट्याने या जेसीबीवर डल्ला मारला. दुसऱ्या दिवशी वाहन गायब असल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली.
advertisement
या प्रकरणाचा तपास करत असताना महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी लक्ष्मण नामदेव नानवटे (वय २६, रा. परळी, जि. बीड) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने पार्किंगमधून जेसीबी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, चोरीला गेलेला मौल्यवान जेसीबी हस्तगत करण्याच्या प्रक्रियेत पोलीस आहेत.
एवढ्या मोठ्या अवजड वाहनाची चोरी झाल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, पोलिसांनी जलद गतीने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
