निवडणूक कामासाठी बसचे नियोजन: पुण्यात १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी रोजी निवडणूक कर्मचारी आणि मतदानाचे साहित्य केंद्रांवर पोहोचवण्यासाठी या बसचा वापर केला जाईल. तसेच मतदानाच्या दिवशी १५ जानेवारीला सकाळपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत या बस निवडणूक ड्युटीवर तैनात असतील.
प्रवाशांना बसणारा फटका: शहरात दररोज सरासरी १,७५० बस रस्त्यावर धावत असतात. मात्र, निवडणूक कामासाठी १,१५० बस वळवण्यात आल्याने प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ ६०० बस शिल्लक राहणार आहेत. बसच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट झाल्यामुळे बस थांब्यांवर मोठी गर्दी आणि बसच्या फेऱ्यांमध्ये विलंब होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, "दोन्ही महापालिकांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, प्रवासी सेवेवर कमीत कमी परिणाम व्हावा, यासाठी जास्तीत जास्त बस उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल."
प्रवाशांनी या दोन दिवसांतील प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि शक्य असल्यास पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
