TRENDING:

Pune : निलेश घायवळमुळे पुण्याच्या राजकारणात खळबळ! धंगेकरांनी थेट शेअर केला चंद्रकांत पाटलांचा फोटो, म्हणाले 'कोल्हापूरला जायला...'

Last Updated:

Ravindra dhangekar On Chandrakant patil : एवढे संवेदनशील चंद्रकांत पाटील असतील तर कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफवली असती का? असा अवाल धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Crime News : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच दुसरीकडे आरोप प्रत्यारोप यांच्यामुळेही राजकारण तापल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यातील भाजपचे उमेदवार लहू बालवाडकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट करत अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे व्हिडिओ शेअर केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता. त्यांनी यावेळी बालवडकर यांचा घायवळसोबतचा फोटो शेअर केला होता. अशातच आता रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणात उडी घेतली असून जोरदार घणाघात केला आहे.
Ravindra dhangekar On Chandrakant patil
Ravindra dhangekar On Chandrakant patil
advertisement

कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफवली असती का?

"गुंडांसोबतच्या व्हायरल व्हिडीओमुळे अमोल बालवडकर यांचं तिकीट कापलं", असं चंद्रकांत पाटील काल एका सभेदरम्यान म्हणाले होते. एवढे संवेदनशील चंद्रकांत पाटील असतील तर कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफवली असती का? असा अवाल धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

नियमाप्रमाणे कोल्हापूरला जायला हवं

आता सोबत दिलेल्या फोटोमध्ये चंद्रकात पाटील आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ दिसत आहे. गुंडगिरीविषयी नैतिकतेचे धडे देणाऱ्या पाटलांनी बालवडकर यांना लावलेल्या नियमाप्रमाणे कोल्हापूरला जायला हवं, अशी टीका रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. दिव्याखाली_अंधार म्हणत धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यामुळे आता पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

advertisement

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी माहिती असतात त्यामुळं अनेक बाबी समोर येतात. अमोल बालवडकर याने कितीही आरडा ओरड केला तरी काही नाही. निलेश घायवाल कुठे गेला याचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे निलेश घायवाल याल शोधायला अमोल बालवाडकरची मदत घ्या. अमोल बालवडकर यांचा निलेश घायवळसोबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बालवडकर यांच्यावर टीका केली.

advertisement

कुख्यात गुंड निलेश घायवळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

दरम्यान, भाजपचे प्रभाग क्रमांक नऊचे अधिकृत लहू बालवडकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ, अमोल बालवडकर दारू पार्टी करत असल्याचं दिसून येत आहेत. हा व्हिडिओ ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर आल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune : निलेश घायवळमुळे पुण्याच्या राजकारणात खळबळ! धंगेकरांनी थेट शेअर केला चंद्रकांत पाटलांचा फोटो, म्हणाले 'कोल्हापूरला जायला...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल