पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बससेवा चालवली जाते. नागरिक मंच, सामाजिक संस्था, प्रवासी संघटनांकडून बस चालकांच्या वर्तनाविषयी वेळोवेळी तक्रारी करण्यात येतात. या तक्रारींची गंभीर दखल घेत पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोल-मुंडे यांनी कडक सूचना जारी केल्या आहेत.
Onion Rate: कांदा बाजारातून मोठं अपडेट, सोलापूर मार्केटमध्ये किती मिळतोय दर?
advertisement
प्रशासनाचे निर्देश:
बस चालवताना मोबाइलवर बोलणे सक्त वर्ज्य
वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक
चालक व कंडक्टरने धूम्रपान करू नये
बस निर्धारित लेनमध्येच चालवावी
स्टॉप ओलांडल्यानंतर प्रवाशांना चढू देऊ नये
भरधाव वेगाने बस न चालवावी
प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे
या नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रथम दोषी चालकावर रुपये 2000 दंड आकारण्यात येईल. तसेच नियम मोडत राहिल्यास त्याला निलंबित केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या सूचनांमुळे पीएमपी बससेवेची शिस्त आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.