प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित २५ वर्षीय आरोपी तरुणाचे एका १५ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिली. मुलीची प्रसूती ससून रुग्णालयात करण्यात आली. मात्र, ही मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यास कायदेशीर कारवाई होईल, या भीतीने आरोपी तरुणाने आणि मुलीच्या आईने एक कट रचला.
advertisement
प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल:
मुलीची प्रसूती झाल्यानंतर पोलिसांना आणि डॉक्टरांना संशय येऊ नये, म्हणून आरोपींनी नागपूर महानगरपालिकेच्या नावे एक बनावट जन्म दाखला तयार केला. या दाखल्यात मुलीचे वय ती सज्ञान (१८ वर्षांवरील) असल्याचे दाखवण्यात आले होते. हाच बनावट पुरावा त्यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना आणि पोलिसांना सादर केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि कागदपत्रांच्या पडताळणीत हा दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस आणि डॉक्टरांची फसवणूक करून अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण लपवल्याप्रकरणी आता आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणुकीच्या कलमांसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
