दारूच्या नशेत पायऱ्यांवरच बसली पीजीमध्ये राहणारी तरुणी; मागून घरमालक आला अन्..., पुण्यातील धक्कादायक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पार्टीत मद्यप्राशन केल्यामुळे पीडितेला शुद्ध नव्हती आणि तिला स्वतःच्या पायावर चालताही येत नव्हतं. तिची ही अवस्था पाहून तिच्या मैत्रिणींनी तिला पीजीपर्यंत आणलं.
पुणे: महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या 'पेईंग गेस्ट' (PG) निवासस्थानीच एका तरुणीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना चंदननगर भागातील बालाजीनगर येथे उघडकीस आली आहे. नशेत असल्यामुळे चालता येत नसलेल्या तरुणीला मदत करण्याऐवजी पीजी मालकाने तिच्याशी अश्लील वर्तन केलं. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपी मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
बालाजीनगर परिसरात एका पीजीमध्ये राहणारी आणि खासगी कंपनीत नोकरी करणारी पीडित तरुणी १२ डिसेंबर रोजी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत एका पार्टीला गेली होती. या पार्टीत मद्यप्राशन केल्यामुळे पीडितेला शुद्ध नव्हती आणि तिला स्वतःच्या पायावर चालताही येत नव्हतं. तिची ही अवस्था पाहून तिच्या मैत्रिणींनी तिला पीजीपर्यंत आणलं. मात्र तिला रूममध्ये न सोडता इमारतीच्या पायऱ्यांपर्यंत आणून सोडलं.
advertisement
पीडित तरुणी पायऱ्यांवर असहाय्य अवस्थेत बसलेली असताना, पीजीचा मालक तिरुमला ऊर्फ रघूराव तिरुम लाय्या कोथा याने तिला पाहिलं. तिची परिस्थिती पाहून तिला मदत करण्याऐवजी आरोपीने तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला. त्याने पाठीमागून येऊन तिला मिठी मारली आणि तिच्याशी लज्जास्पद वर्तन केलं. या अनपेक्षित प्रकारामुळे पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र नशेत असल्याने ती प्रतिकार करू शकली नाही.
advertisement
या धक्क्यातून सावरल्यानंतर तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी तिरुमला कोथा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साळवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा प्रकारे महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या मालकानीच गैरवर्तन केल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 7:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दारूच्या नशेत पायऱ्यांवरच बसली पीजीमध्ये राहणारी तरुणी; मागून घरमालक आला अन्..., पुण्यातील धक्कादायक घटना









