पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातील निलेश घायवळ याच्या मालमत्तांची कसून तपासणी केली. या तपासणीत, घायवळ याच्याकडे कुठलाही शस्त्र परवाना नसताना त्याच्या घरी जिवंत काडतुसे सापडल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घायवळच्या घरात जिवंत काडतुसं आढळल्याने त्यांचा पुण्यात काही रक्तपात घडवायचा प्लॅन होता का? याचा तपास करत पोलीस करत आहेत.
सध्या परदेशात फरार असलेल्या घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याच्या राज्यातील मालमत्तांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. याआधी पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरी छापेमारी केली होती. तेव्हा पोलिसांच्या हाती काहीही लागलं नव्हतं. आता पोलिसांनी पुण्यातील कोथरुड परिसरात असलेल्या दोन घरांवर छापेमारी केली. त्याच्या घरी जिवंत काडतुसं आढळली आहेत.
advertisement
शस्त्र परवाना नसताना जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलली आहेत. याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये निलेश घायवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश घायवळ हा पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या घायवळ टोळीचा म्होरक्या आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. घायवळ नेमका कुठे कुठे जात आहे. याचा माग पोलिसांकडून काढला जात आहे. आता घायवळच्या घरात आढळलेली काडतुसं त्याच्याकडे नक्की कुठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत.