पुण्यातील दोन महिलांमार्फत रॅकेट
गुरुवारी सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी मिरजोळे परिसरात छापा टाकला. या ठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून एक नेपाळी महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती. पोलिसांच्या चौकशीत ही महिला पुण्यातील दोन महिलांमार्फत हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्या दोन्ही पीडित महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी पाठवले.
advertisement
अवैध धंदा सुरू
आरोपी नेपाळी महिला काही वर्षांपूर्वी घरकाम आणि वॉचमन म्हणून काम करत होती. मात्र, त्यानंतर तिने जिल्ह्याबाहेरील महिलांना देहविक्रीसाठी प्रवृत्त करून त्यांच्या कमाईपैकी 50 टक्के हिस्सा स्वतःकडे ठेवत हा अवैध धंदा सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महिलेचा अधिक तपास सुरू केला असून, प्लॉट मालकाचीही चौकशी केली जाणार आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 20, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : घरकाम केलं, सुरुवातीला वॉचमन, नंतर बनली रॅकेटची सूत्रधार! पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं 'पुणे कनेक्शन'