TRENDING:

Pune Crime: 12 वर्षाच्या 'त्या' मुलाची निर्घृण हत्या समलिंगी संबंधाच्या विरोधामुळे? पुण्याला हादरवणाऱ्या प्रकरणात खळबळजनक खुलासा

Last Updated:

याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भावकीतीलच एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असणाऱ्या मांजरेवस्ती येथे मंगळवारी एकच खळबळ उडाली. दहिवडी गावातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली. मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास 12 वर्षीय मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात कल्लोळ उडाला होता. साईराज गणेश मांजरे असं मृत मुलाचं नाव आहे. सुरूवातीला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात होता. पण आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे.
विहिरीजवळ साईराजचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला
विहिरीजवळ साईराजचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला
advertisement

घरच्या जवळील एका विहिरीजवळ साईराजचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेने दहशतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साईराज नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आला होता. गणवेश बदलून तो खेळण्यासाठी बाहेर पडला, मात्र तो परतलाच नाही. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मांजरेवस्ती परिसरातील एका विहिरीपाशी त्याचा मृतदेह रक्ताळलेल्या आणि अर्धनग्न अवस्थेत सापडला. त्याच्या अंगावर जखमांच्या खुणा असल्याने ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

advertisement

याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भावकीतीलच एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे चिडून या नराधमाने साईराजचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस संशयित आरोपीची कसून चौकशी करत असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर हत्येचे नेमके गूढ उकलणार आहे.

advertisement

वर्षभरापूर्वी असंच घडलं होतं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
300 रुपयांना खरेदी करा अन् 500 ला विका, व्यवसायासाठी होलसेल भावात शर्ट्स, पिंपरीत हे आहे मार्केट
सर्व पहा

धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी याच शेतात याच जागेवर वर्षभरापूर्वी 11 वर्षीय यश गायकवाड या मुलाचा मृतदेह अशाच अवस्थेत आढळला होता. त्यामुळेच आता पुन्हा अशाच पद्धतीने मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहून पोलीस आता अधिक गांभीर्याने तपास करत असून, तपासात अनेक गोष्टी स्पष्ट होतील असा विश्वास गिल यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 12 वर्षाच्या 'त्या' मुलाची निर्घृण हत्या समलिंगी संबंधाच्या विरोधामुळे? पुण्याला हादरवणाऱ्या प्रकरणात खळबळजनक खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल