नामांकित कंपनीचे आमिष आणि फसवणुकीची पद्धत: मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी हर्षलला एका नामांकित कंपनीत 'सिनीअर सॉफ्टवेअर इंजिनिअर' म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवले. 'अश्विनी सिंघानिया' नावाचा वापर करून एका अज्ञात व्यक्तीने हर्षलशी संपर्क साधला. विश्वास संपादन केल्यानंतर, चोरट्यांनी विविध तांत्रिक कारणांचा बनाव रचला. यामध्ये प्रामुख्याने सबस्क्रिप्शन चार्जेस, नवीन खाते उघडणे, एफ-६ (F-6) फॉर्म फी, किट ॲक्टिव्हेशन आणि सिक्युरिटी क्लिअरन्स अशा वेगवेगळ्या नावाखाली हर्षलला ऑनलाइन पैसे भरण्यास भाग पाडले.
advertisement
५ मे ते ६ ऑक्टोबर २०२५ या सहा महिन्यांच्या काळात चोरट्यांनी टप्प्याटप्प्याने ही मोठी रक्कम उकळली. वारंवार पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याचे आणि दिलेली आश्वासने खोटी असल्याचे लक्षात येताच हर्षलने पोलिसांत धाव घेतली.
वाकड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांकधारकावर गुन्हा दाखल केला आहे. शहरात उच्चशिक्षित तरुणांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नोकरीसाठी कोणत्याही कंपनीकडून अशा प्रकारे पैशांची मागणी केली जात नाही, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
