वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा धोका
लोणी स्टेशन चौक परिसरात महामार्गावर हॉटेलसमोर वाहने धोकादायक पद्धतीने उभी केली जातात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. या परिसरातील नागरिकांनी या गाड्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरात नर्सरी, सिमेंट पाइप तयार करणाऱ्या कंपन्या आणि इतर उद्योग असल्यामुळे येथे अवजड वाहने सतत ये-जा करत असतात. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
advertisement
25 मिनिटांच्या प्रवासाला 2 तास
हडपसर ते उरुळी कांचनचा प्रवास आधी 20–25 मिनिटांत पार होऊ शकायचा, मात्र सध्या या मार्गावरून जाण्यास दोन ते अडीच तास लागत आहेत. रुग्णवाहिका आणि इतर चारचाकी वाहनांसाठी ही परिस्थिती विशेषत: अडचणीची ठरत आहे. हडपसरपासून मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, उरुळीकांचन आणि खेडेकरमळा या भागांत वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.






