TRENDING:

Pune News:मृत्यूनंतरही तो दुसऱ्या शरीरात 'जिवंत' राहिला; 34 वर्षीय तरुणानं पुण्यातील दोघांना कसं दिलं नवं आयुष्य?

Last Updated:

यकृताचा एक भाग तीव्र यकृत निकामी झालेल्या सहा वर्षांच्या चिमुरड्यावर प्रत्यारोपित करण्यात आला, तर दुसरा मोठा भाग दीर्घकालीन यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या ५८ वर्षीय रुग्णावर यशस्वीरीत्या बसवण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी कौतुकास्पद आणि सकारात्मक घटना समोर आली आहे. यात एका ३४ वर्षीय ब्रेन डेड रुग्णाच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे आणि डॉक्टरांच्या कौशल्यामुळे दोघांना जीवनदान मिळालं. एकाच यकृतातून दोन वेगवेगळ्या रुग्णांना नवं आयुष्य मिळालं आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात ही दुर्मीळ 'स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट' शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
ब्रेन डेड रुग्णामुळे मिळालं नवं आयुष्य (प्रतिकात्मक फोटो)
ब्रेन डेड रुग्णामुळे मिळालं नवं आयुष्य (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

एका अवयवातून दोन रुग्णांचे प्राण वाचले

साधारणपणे एका दात्याचे यकृत एकाच रुग्णाला दिले जाते. मात्र, या प्रकरणात दात्याचे यकृत अत्यंत कार्यक्षम असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला. यकृताचा एक भाग तीव्र यकृत निकामी झालेल्या सहा वर्षांच्या चिमुरड्यावर प्रत्यारोपित करण्यात आला, तर दुसरा मोठा भाग दीर्घकालीन यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या ५८ वर्षीय रुग्णावर यशस्वीरीत्या बसवण्यात आला.

advertisement

Virar News: डॉक्टर नाही, पदवी नाही, तरीही चालवत होते 'स्पर्म बँक'! विरारमधील पद्मीबाई टॉवरमधील काळेधंदे उघड

डॉ. निनाद देशमुख आणि त्यांच्या पथकाने ही गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली. यकृताचे दोन भाग करताना ते दोन्ही रुग्णांसाठी कार्यक्षम राहतील याची काळजी घेणे हे मोठे आव्हान होते. "दोन्ही रुग्ण सध्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे," अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

एका अवयवातून दोन जीव वाचवल्यामुळे या शस्त्रक्रियेचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी त्याने केलेल्या अवयवदानामुळे ती व्यक्ती अनेक रूपात जिवंत राहू शकते, हेच या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News:मृत्यूनंतरही तो दुसऱ्या शरीरात 'जिवंत' राहिला; 34 वर्षीय तरुणानं पुण्यातील दोघांना कसं दिलं नवं आयुष्य?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल