TRENDING:

पुण्यातील स्पा सेंटरधून तीन तरुणींची सुटका, मसाजच्या नावाखाली सुरू होता नको तो प्रकार

Last Updated:

पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. संबंधित मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरच्या ऑपरेटरसह मॅनेजर आणि स्पा सेंटरशी संबंधित इतर काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसायात गुंतलेल्या तीन तरुणींची सुटका केली आहे.
News18
News18
advertisement

पुण्याच्या खराडी बायपास चौकातील सन शाईन स्पामध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. चंदननगर पोलिसांच्या पथकाने आधी सापळा रचला, वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटवली आणि त्यानंतर मसाज सेंटरवर छापा टाकला, जिथे पोलिसांना मसाजच्या नावाखाली तीन महिलांचे शोषण होत असल्याचे आढळले.

या छापेमारीची अधिक माहिती देताना डीसीपी झोन ​​IV चे सोमय मुंडे यांनी सांगितलं की, "आम्ही तीन महिलांची सुटका केली आणि त्यांची रवानगी महिलासुधारगृहात करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी स्पा ऑपरेटर आणि मॅनेजरसह उर्वरित कर्मचाऱ्यांवर अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 3,4,5 आणि बीएनएसच्या कलम 143, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे."

advertisement

मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट वाढत असल्याने, या स्पा सेंटरचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या नेटवर्कशी संबंध आहे का? हे शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील स्पा सेंटरधून तीन तरुणींची सुटका, मसाजच्या नावाखाली सुरू होता नको तो प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल