नेमकी घटना काय?
शर्ली एन. अन्थोनी (वय ३७, रा. कोंढवा गेट, उत्तमनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून एनडीए रस्त्यावरील भाजी मंडई चौकातून जात होत्या. यावेळी पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन जोरात घसरले. या भीषण अपघातात शर्ली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
पुणेकरांनो सावधान! घराची चावी कुंडीत किंवा चप्पल रॅकमध्ये ठेवताय? वाघोलीत घडली धक्कादायक घटना
पतीवर का झाली कारवाई?
अपघाताचा तपास केल्यानंतर पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले की, अपघाताच्या वेळी दुचाकीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. भरधाव वेगात दुचाकी चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळेच हा अपघात झाला आणि एका महिलेचा बळी गेला. यामुळे उत्तमनगर पोलिसांनी संबंधित पतीविरुद्ध 'अपघातास कारणीभूत ठरून मृत्यूस जबाबदार असणे' या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
