TRENDING:

'25 लाखात अर्धा तोळे सोनं मिळणार'; पुण्यातील महिलेनं लगेचच दिले पैसे अन् झाला गेम

Last Updated:

किमतीत सोनं देण्याचं आमिष दाखवून एका ५८ वर्षीय महिलेची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी चोरीच्या घटनाही समोर येत आहेत. अशातच आता पुण्यात यांच्याशीच संबंधित एक अजब घटना समोर आली आहे. यात कमी किमतीत सोनं देण्याचं आमिष दाखवून एका ५८ वर्षीय महिलेची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अर्धा किलो (५०० ग्रॅम) सोनं केवळ २५ लाख रुपयांमध्ये देण्याचं आश्वासन आरोपींनी दिलं होतं. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
महिलेची फसवणूक (AI Image)
महिलेची फसवणूक (AI Image)
advertisement

गुन्हा दाखल

या फसवणुकीबाबत ५८ वर्षीय पीडित महिलेनं उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पवन मकसूद ठाकूर (वय ३९, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, मालाड, मुंबई) आणि राजू ऊर्फ गिट्टी या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आळंदीत दर्शनासाठी आलेल्या 2 वारकऱ्यांचं अपहरण; महिलेनं ठेवलं डांबून, मग धक्कादायक मागणी

advertisement

ओळखीचा फायदा घेऊन फसवणूक

तक्रारदार महिला एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहते. आरोपी पवन ठाकूर याची ओळख या महिलेसोबत होती. याच ओळखीचा फायदा घेत त्याने आणि त्याच्या साथीदाराने महिलेला फसविण्याचा कट रचला.

आरोपींनी महिलेला सांगितलं की, बाजारातील सध्याच्या दरापेक्षा खूपच कमी किमतीत म्हणजेच केवळ २५ लाख रुपयांमध्ये ते तिला अर्धा किलो (५०० ग्रॅम) सोने देऊ शकतात. सोन्याच्या स्वस्त दराच्या आमिषाला बळी पडून महिलेनं आरोपींवर विश्वास ठेवला. आरोपींनी वेळोवेळी महिलेकडून पूर्ण २५ लाख रुपये रोख घेतले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचं मार्केट हाललं, लिंबू अन् शेवग्यालाही भाव, कुठं मिळाला सर्वाधिक दर?
सर्व पहा

पैसे घेऊनही आरोपींनी महिलेला ठरल्याप्रमाणे सोनं दिलं नाही आणि त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत असून, दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
'25 लाखात अर्धा तोळे सोनं मिळणार'; पुण्यातील महिलेनं लगेचच दिले पैसे अन् झाला गेम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल