आळंदीत दर्शनासाठी आलेल्या 2 वारकऱ्यांचं अपहरण; महिलेनं ठेवलं डांबून, मग धक्कादायक मागणी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अपहरणकर्त्यांनी दोघा वारकऱ्यांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि त्यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवलं. त्यानंतर त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि धमकावण्यात आलं
पिंपरी-चिंचवड: आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या दोन वारकऱ्यांचं अपहरण करण्यात आलं . पैशांसाठी अपहरण करून त्यांना एका खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. ९) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आळंदीतील चाकण चौक परिसरात हा प्रकार घडला होता. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या प्रकरणात एका महिलेसह दोन संशयितांना अटक केली असून, अपहृत वारकऱ्यांची सुखरूप सुटका केली आहे.
दगडू शिवराम गायकवाड (वय ६२) आणि त्यांचे मित्र प्रशीक आंबोरे (वय ६०) अशी अपहरण झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. दर्शनानंतर हे दोघेही आळंदी मंदिराच्या जवळ असलेल्या चाकण चौकात आले होते. यावेळी, मोटारीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांचे अपहरण केले.
अपहरणकर्त्यांनी दोघा वारकऱ्यांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि त्यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवलं. त्यानंतर त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि धमकावण्यात आले. सुदैवाने, या दोन वारकऱ्यांपैकी एक वारकरी पळून जाण्यात यशस्वी झाला.
advertisement
दरम्यान, अपहृत वारकरी दगडू गायकवाड यांचे पुत्र सदानंद गायकवाड (वय ३५, रा. रिसोड, जि. वाशीम) यांना खंडणीची मागणी करणाऱ्यांचा फोन आला. वडिलांचे अपहरण झाल्याचे कळताच त्यांनी तत्काळ आळंदी पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. सदानंद यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सचिन सुरेश मोरे (वय ३०, रा. चऱ्होली खुर्द, खेड) आणि एका ४० वर्षीय महिलेला (रा. चऱ्होली खुर्द, खेड) अटक केली आहे.
advertisement
तांत्रिक तपासाद्वारे सुटका
view commentsघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस उपनिरीक्षक अमित गिरिगोसावी यांनी सांगितलं की, अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलचे लोकेशन आणि इतर तांत्रिक तपास करून संशयितांचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या दुसऱ्या वारकऱ्याचीही सुटका करण्यात आली आणि अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 6:57 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
आळंदीत दर्शनासाठी आलेल्या 2 वारकऱ्यांचं अपहरण; महिलेनं ठेवलं डांबून, मग धक्कादायक मागणी










