या ठिकाणांहून बस सुटणार
पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष पर्यटन बस प्रत्येक शनिवार व रविवारी स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथून सुटणार आहे. या बसद्वारे पर्यटकांना प्रथम पाबळ येथील ऐतिहासिक मस्तानीची कबर तसेच पाबळमधील जैन समाजाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मणिभद्र मंदिराला भेट देता येणार आहे. यानंतर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या आणि मोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोराची चिंचोली या गावात दिवसभर भ्रमंती करता येणार आहे.पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून मार्ग क्रमांक सात अ हा चालू केला आहे.
advertisement
या विशेष पर्यटन बस सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना एका दिवसात ऐतिहासिक वारसा, धार्मिक स्थळे तसेच निसर्गरम्य परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पुणे शहरासह परिसरातून या भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर रोजगार व पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या या परिसराच्या विकासात या बस सेवेचा उपयोगी ठरणार असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
