पुणे : राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, लोकल18 च्या टीमने राज्यातील पावसाचा घेतलेला हा आढावा.
मुंबई आणि उपनगरात पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबईकरांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत कमाल 30°C तर किमान 22°C तापमान असेल.
advertisement
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून काही प्रमाणात पाऊसाची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पुणे व आसपासच्या परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात उद्या कमाल 29°C तर किमान 20°C तापमान असेल.
तब्बल 20 वर्षांची परंपरा, पुण्यात साजरी केली पुस्तकांची दहीहंडी, नेमका काय आहे हा उपक्रम?, VIDEO
विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहून वीजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये कमाल 30°C तर किमान 21°C तापमान असेल.
नाशकात कांद्याने पुन्हा डोळ्यात आणलं पाणी, भाव ऐकूनही तुम्हालाही बसेल धक्का, विक्रेते काय म्हणाले?
मराठवड्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये उद्या कमाल 31°C तर किमान 25°C तापमान असेल.
राज्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. पुढील काही दिवस अशा स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.