नेमकं काय म्हणाले राऊत?
'लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना ठीक आहे. पण अनेक भाऊ सध्या बेरोजगार आहेत. उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत. पुण्यातील अनेक भाऊ हे नशेच्या आहारी गेले आहेत. गुजरातमधून ड्रग्स पुण्यात येतं. पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्सचं केंद्र बनलं आहे. बुलडोझर चालून व्यवहार कमी होणार नाहीत' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. 'महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल काय लागला हे आपण पाहिलं आहे. आम्ही निवडणूक एकत्र लढवणार आहोत. महाविकास आघाडीला शंभर टक्के बहुमत मिळेलं. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. या राज्यातील जनतेनं त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व झिडकारलं आहे. फडणवीस स्वत:ला नाना फडणवीसांचा मोठा भाऊ समजत होते पण तसं काही नाहीये, नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. फडणवीसांना त्यात स्थान नाहीये,' असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
