TRENDING:

वारी 2024 : तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, VIDEO

Last Updated:

कालच पालखी पुण्यामध्ये दाखल झाली आहे आणि आज पालखी चा मुक्काम हा नाना पेठ येथे असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राचा महापर्व. लाखो भाविक वारी करत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात. नेहमीप्रमाणे या वर्षीही ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारांची पालखी पंढरीकडे रवाना झाल्या आहेत. आज तुकोबारायांची पालखी नाना पेठ येथे असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामासाठी आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पादुकानाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात वारकऱ्याची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर काही वेळा पूर्वीच पादुकांचा अभिषेकही करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक अशी रंगीत फुलांची सजावट सजावट करण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळलेला पाहायला मिळत आहे.

advertisement

wari 2024 : वारी का काढली जाते? कोण आहेत वारीचे जनक? असा आहे वारीचा भव्य-दिव्य इतिहास

या निवडुंग्या विठोबाच्या मंदिराची महतीही तितकीच मोठी आहे. या निवडुंग्या विठोबा मंदिराच्या परिसरात पूर्वी सर्व निवडुंगाची झाडं होती. त्यावेळी गोसावी समाजातील अनेक मंडळी वारीला जात. त्यांना विठ्ठलानं दृष्टांत दिला. ‘मी या ठिकाणी निवडुंगाच्या झाडात आहे. मला बाहेर काढा’ हा दृष्टांत मिळाल्यानंतर गोसावींनी शोध घेतला, त्यावेळी त्यांना विठ्ठलाची मूर्ती सापडली. त्यामुळे या देवस्थाला निवडुंग विठोबा मंदिर, असं म्हणतात.

advertisement

Wari 2024: देहू गावात जिथं संत तुकोबा राहिले, ती वास्तू आज कशी आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

हे मंदिर जवळपास 800 वर्ष जुने आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचा मोठा बंदोबस्तही याठिकाणी पाहायला मिळतो. मंदिराच्या वतीने वारकऱ्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यानंतर उद्या सकाळी सात वाजता पालखीचे पंढरीकडे प्रस्थान होणार आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त विशाल धनवडे यांनी लोकल18 शी बोलताना दिली.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
वारी 2024 : तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल