नेमकी घटना काय घडली?
पुण्यातील प्रियांका जगदाळे यांची ही अंगठी होती. सकाळी मुलाचा टिफिन बनवण्याच्या घाईगडबडीत प्रियांका यांनी आपली अंगठी बाजूला काढून ठेवली आणि घरातील कचरा गोळा करत असताना ती चुकून कचऱ्याच्या डब्यात टाकली. काही काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली अंगठी हरवली आहे. त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
Purandar Airport: पुरंदर विमानतळ गेमचेंजर ठरणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
advertisement
अखेर अंगठीचा शोध लागला कसा?
शालन वायला या गेल्या 10 वर्षांपासून कचरा वेचकाचं काम करत आहेत. 22 डिसेंबरला नेहमीप्रमाणे मंगळवार पेठ या भागात कचरा गोळा करण्याचं काम करत होत्या. त्यांनी घरोघरी जाऊन कचरा गोळा केला आणि त्यानंतर त्या गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी बसल्या. कचरा बाजूला काढत असताना त्यांना अचानक एक सोन्याची अंगठी सापडली. ही अंगठी सुमारे 10 ग्रॅम (एक तोळा) वजनाची होती. त्यांनी त्या अंगठीच्या मूळ मालकाचा म्हणजे प्रियांका जगदाळे यांचा शोध घेतला आणि त्यांच्याकडे ती सुपूर्द केली. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा माणुसकी अजून जिवंत असल्याचं उदाहरण आहे.





