TRENDING:

पुण्यात खळबळ! महिला पोलीस डॉक्टरकडे गेली, रुग्णालयातील त्या गोळ्या अन् साहित्य पाहून धक्का, मग क्लिनिकचा केला 'गेम'

Last Updated:

महिला पोलीस हवालदार प्रतीक्षा पानसरे यांनी या मोहिमेत 'हिरो'ची भूमिका बजावली. त्यांनी स्वतः बनावट रुग्ण बनून क्लिनिकमध्ये प्रवेश केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. 'लाईफ केअर क्लिनिक'मध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचण्यांचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. या कारवाईत क्लिनिक सील करण्यात आले असून डॉक्टरसह दलालाचे धाबे दणाणले आहेत.
'लाईफ केअर क्लिनिक'मध्ये छुप्या पद्धतीने अवैध गर्भलिंग निदान
'लाईफ केअर क्लिनिक'मध्ये छुप्या पद्धतीने अवैध गर्भलिंग निदान
advertisement

महिला पोलिसाचे धाडस

वाघोली पोलीस घटकातील महिला पोलीस हवालदार प्रतीक्षा पानसरे यांनी या मोहिमेत 'हिरो'ची भूमिका बजावली. त्यांनी स्वतः बनावट रुग्ण बनून क्लिनिकमध्ये प्रवेश केला. त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर बुधवारी (दि. ४) प्रशासनाने अचानक छापा टाकला आणि संपूर्ण रॅकेट उघड्यावर आलं.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अघोरी वापर

या तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, केसनंद येथील नरेंद्र ठाकरे नावाच्या दलालाच्या मदतीने मोबाईल अॅपद्वारे गर्भस्थ अर्भकाचे लिंग निदान केले जात होते. बीएएमएस डॉक्टर आकाश सुभाष मलगुंडे यांच्या अधिपत्याखाली हे क्लिनिक चालत होते. आरोग्य नियमांना हरताळ फासून इथे केवळ लिंग निदानच नाही, तर गर्भपाताच्या गोळ्यांचा अनधिकृत साठाही सापडला आहे.

advertisement

काय काय जप्त झाले?

औषध प्रशासनाच्या कक्षेबाहेरील गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा, अवैध वैद्यकीय उपकरणे आणि तांत्रिक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. संपूर्ण दवाखाना सील करून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

ही कारवाई आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले आणि क्राईम ब्रँच युनिट ७ च्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध 'PCPNDT' कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार कठोर फौजदारी कारवाई प्रस्तावित आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात खळबळ! महिला पोलीस डॉक्टरकडे गेली, रुग्णालयातील त्या गोळ्या अन् साहित्य पाहून धक्का, मग क्लिनिकचा केला 'गेम'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल