पुणे : शिवबा जन्मायचा असेल तर आपण जिजाऊ होऊ, अशी हाक देत पिंपरी चिंचवड मधील संजीवनी महिला शाहीर पथकाचा डफ महाराष्ट्रभर घूमतोय. पोवाडा सादरीकरणातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत या महिला शाहीर वीररसातून नवी ऊर्जा देऊन समाजप्रबोधन करत आहेत. नवीन पिढीला देशाचा इतिहास समजून देण्याचे काम या महिला शाहीर करत आहेत.
advertisement
महाराष्ट्र शाहीर परिषदेचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध शाहीर योगेश (दिवाकर नारायण भिष्णूरकर) यांच्या प्रेरणेतून त्यांची कन्या शाहीर वृषाली कुलकर्णी यानी 2010 मध्ये शिवबा जन्मयचा असेल तर आपण जिजाऊ होऊ, या ध्येयाने प्रेरितहोऊन संजीवनी महिला शाहीर पथक स्थापन केले. घरातील कामाची जबाबदारी, नोकरी, व्यवसाय सांभाळून या पथकातील महिला पारंपारिक कला जोपासत ती वृद्धिंगत करत आहेत.
शाहिरीतून समाजप्रबोधनाचे काम 15 वर्षांपासून सुरु आहे. यातून मिळणाऱ्या निधीतून प्रशिक्षण शिबीर, बालशाहीर, महिला शाहीर पुरस्कार, दहावीपास बालशाहीर विद्यार्थ्यांचा सत्कार असे उपक्रम देखील त्यांच्या तर्फे राबविले जातात, अशी माहिती संजीवनी पथकाच्या वनिता सावंत यांनी दिली आहे.
शिवजयंतीला गाजणार 'शिवबाचं नाव', नव्या गाण्याचा अमेरिकेत डंका, अभिनेता विशाल निकमनं सांगितला अनुभव
या पथकाने आजवर महाराष्ट्रभर महिला पारंपरिक कला जोपासत आणि 350 हुन अधिक कार्यक्रम केले आहेत, जागर आदिशक्तीचा, शाहिरी शिवायन आणि झंकार महाराष्ट्राचा या तीन संकल्पनावर आधारीत कार्यक्रम केले जातात. या पथकामध्ये वनिता मोहिते, कांचन जोशी, चित्र कुलकर्णी, लीना देशपांडे, स्मिता बंदिवडेकर, प्रचिती भीष्णूरकर, भारती फिस्के, ईशा बंदिवडेकर, अदिती फिस्के, उद्धव गुरव, कीर्ती मराठे, शाल्मली राखीलकर,अर्णवी राखीलकर, भक्ती फिस्के यांचा समावेश आहे.