पोलिसांनी याप्रकरणी सुमित देदवाल (२५) आणि अक्षय मेहर (२५) या दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांनी गांजा पिकवण्यासाठी मातीऐवजी पाण्याचा वापर करणारे 'हायड्रोपोनिक' तंत्रज्ञान निवडले होते. फ्लॅटमधील तापमान, आर्द्रता आणि रोपांची वाढ नियंत्रित करण्यासाठी त्यांनी AI आधारित उपकरणांचा वापर केला होता. अत्यंत उच्च दर्जाचा मानला जाणारा ‘OG-Kush’ गांजा ते या लॅबमध्ये पिकवत होते.
advertisement
या रॅकेटचे कामकाज पूर्णपणे डिजिटल आणि हाय-टेक होते. गांजाच्या उत्पादनासाठी लागणारे बियाणे आणि इतर साहित्य हे 'डार्क वेब' आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मागवले जात असे. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी हे आरोपी व्यवहारासाठी 'क्रिप्टोकरन्सी'चा वापर करत होते. तपासात असेही समोर आले आहे की, गांजाची खेप थायलंडवरून 'इलेक्ट्रॉनिक सामान' असल्याचे भासवून भारतात मागवली जात होती.
मुंबईपर्यंत पसरली तपासाची चक्रे: हिंजवडीतील छाप्यात पोलिसांनी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि महागडी उपकरणे जप्त केली. अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून या रॅकेटचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पुणे पोलिसांनी मुंबईत धाड टाकून सप्लायर मालय राजेश देलीवाला आणि स्वराज भोसले यांना बेड्या ठोकल्या. मुंबईतील कारवाईत सुमारे २.८ कोटी रुपयांचे हॅश, सीबीडी ऑइल आणि गांजा असा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सुशिक्षित तरुण तंत्रज्ञानाचा वापर करून अशा गुन्हेगारी मार्गाकडे वळत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
